Monday, 25 April 2022
बाबासाहेब - एक परफेक्ट स्ट्रॅटेजीस्ट…
Sunday, 24 April 2022
'अनाहिलेशन ऑफ कास्ट'
Saturday, 23 April 2022
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कामगार-2
Friday, 22 April 2022
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कामगार-1
बरं बाबासाहेबांनी केलेल्या या दोन गोष्टी आपल्याला ठाऊक आहेत का?स्वातंत्र्यपूर्व कालखंडात विविध क्षेत्रांत जेथे जेथे स्किल्ड लेबरची गरज असे तिथे भारतीय कामगारांना एंट्री नव्हती. तेथे काम करण्यासाठी इंग्लंडवरून कामगार आयात केले जात. आणि जे काही स्किल्ड वर्कर होते त्यांना नेमकं कसं हुडकून काढावं याचा मोठा पेच ब्रिटीशांपुढे होता. त्यामुळे अनेक कामांसाठी इंग्लंडवरून कामगारांची मोठी आयात होत असे. बाबासाहेबांनी मजूर मंत्री पदाचा चार्ज सांभाळताच सर्वात आधी ही आयात थांबवली. आणि येथील कामगारांच्या हक्काचे काम त्यांना मिळवून दिले.
1. बाबासाहेबांनी १९५३ साली ‘मुंबई कामगार कल्याण निधी अधिनियम, १९५३ हा कायदा गठीत करण्यात आला.
2. १३ मार्च १९५४ ला कोळसा उत्पादन आणि स्त्री खाण कामगार या दोन्ही बाबींचा विचार मांडून कामगारांचा महागाई भत्ता, नुकसान भरपाई, असमान महागाई भत्त्याला मजूर संघटना जबाबदार, बेकारीच्या काळातील नुकसान भरपाईची पद्धत, कामगाराचा राजीनामा, खाण कामगारांचे वेतन व सवलती, मजूर खात्याचा नोकरवर्ग, कोळशाच्या उत्पादनाचा प्रश्न, स्त्री खाण कामगार आणि महिला परिषद यावर डॉ. आंबेडकरांनी भरीव काम केले.
3. ज्याप्रमाणे पुरुष खाण कामगारांबद्दल डॉ. आंबेडकरांनी विचार व्यक्त केले त्याचप्रमाणे स्त्रियांबाबतही२९ मार्च १९४५ ला विधेयक आणून चर्चा केली. स्त्री कामगारांचे हित जोपासले. प्रसुतीच्या काळात विश्रांतीची तरतूद, रोख मदत इत्यादी तरतुदी केल्या.
4. किमान चार आठवडे प्रसुती भत्ता मिळावा तसेच कामगार गैरहजर असताना त्यांना पगारी सुट्ट्या मिळाव्यात त्याचबरोबर कायद्याखाली नियम करण्याचा अधिकार आणि खाण कामगारांना शॉवर बाथचीयोजनासुद्धा अंमलात आणली होती.
5. युद्धकाळातही मजुरांना योग्य न्याय मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यातील नोकरीच्या अटशक्तीचा लवाद, मजुराचे प्रश्न व मजूर खाते, स्त्री पक्ष मजूर परिषदेचे महत्त्व, मजुराचे बहुरंगी पुढारी, पगारी सुट्यांचे वर्गीकरण केले.
6. हे सर्व कायदे आजही अंमलात आहेत. एंम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्येफॉर्म भरणाऱ्या मुलांना ही गोष्ट ठाऊक असायला हवी. आज सरकारी सेवेतील महिलांना मिळणारी प्रसूती रजा. स्वरक्षणाचे हक्काची व्याख्या नैसर्गिक हक्क म्हणून करणे, चाईल्ड केअर लिव साठी दोन वर्षे भरपगारी रजा हे सारं काही बाबासाहेबांनीच करून ठेवलंय.
बाबासाहेबांचे कामगार धोरण हे डाव्या विचारसरणीच्या अगदी भिन्न होते. डाव्यांनी कायम कागारांना संपाच्या बेडीत अडकवून एकसुरू संघर्षाची सवय घालून दिली. खरा दोष तर भांडवलदांरांत होता. बाबासाहेबांनी नेमकं हेच हेरलं होतं. संप करणे हा अपराध मानून अनेक मालकांनी कामगार कपातीचं धोरण अवलंबलं होतं. शेकडो मजूरांच्या नोकऱ्या गेल्या. आणि त्यातून उभा राहीला होता औद्योगिक कलहाचा वाद.सप्टेंबर 1938 साली मुंबई विधिमंडळात औद्योगिक कलहाचे विधेयक विचारासाठी मांडले गेले. बाबासाहेब आणि जमनादास मेथा यांनी त्याला कडाडून विरोध केला. कारण त्या विधेयकाअन्वये 'विशिष्ट परिस्थितीत संप करणे बेकायदेशीर ठरविले होते.'बाबासाहेब म्हणाले, ''संप करणे हा दिवाणी अपराध आहे, फौजदारी गुन्हा नव्हे. मनाच्या इच्छेविरुध्द त्याला काम करण्यास भाग पाडणे म्हणजे कामगाराला गुलाम बनविणे होय. संप म्हणजे कामगारांचा आपण कोणत्या अटीवर नोकरी करण्यास तयार आहोत, हे सांगावयाचे स्वातंत्र्य असलेला हक्क होय.'''कामगारांच्या नागरिक स्वातंत्र्याच्या गळचेपीचा कायदा' या विषयावर बाबासाहेबांची सभापतींशी वादळी चर्चा झाल्याने बाबासाहेबांनी सभागृहाबाहेरच संप पुकारण्याचा पवित्रा घेतला. जवळपास लाखाची सभा झाली. त्यात ९० टक्क्यांहून अधिक तर स्वतंत्र मजूर पक्षाचेच होते. हा संप अयशस्वी व्हावा यासाठी गिरणी मालकाने पोलिस बळाचा वापर केला. त्यात ७२ कामगार जखमी झाले. ३५ कामगारांना अटक झाली. पण संप यशस्वी झाला. कामगार संघटनांचा विजय झाला. स्वतंत्र मजूर पक्ष बळकट झाला. या कामगारांच्या लढ्यामुळे मालक, भांडवलदार वर्गात प्रचंड खळबळ माजली होती. संपाच्या सांगता सभेत बाबासाहेब म्हणाले,''केवळ सभेत उपस्थित राहून घसा फुटेपर्यंत काळया कायद्याचा निषेध करून कार्य होणार नाही. आपले प्रतिनिधी निवडून देऊन तुम्ही राज्यसत्ता हस्तगत केली पाहिजे.'' आता बाबासाहेबांची प्रतिमा प्रथम श्रेणीचे कामगार नेते म्हणून झाली होती.यानंतर लगेच 1938 च्या मातंग (पंढरपूर) परिषदेनंतर बाबासाहेब शेतावर राबणाऱ्या मजूरांच्या प्रश्नाला भिडले. त्यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना भेटले. पुन्हा मोर्चासमोर झालेल्या भाषणामुळे मजूर या विषयाचे क्षेत्र तर व्यापक झालेच, तसेच 'कामगार नेतेपद' ही अधोरेखित झाले.यानंतर दि. 12 जुलै 1941 रोजी म्युनिसिपल कामगार संघाच्या अधिवेशनात बाबासाहेबांनी मार्गदर्शन केले. या सर्व चिंतनाचा, कार्याचा परिणाम असा झाला की, तत्कालीन व्हाइसरॉय लिनलिथगो यांनी 2 जुलै 1942 रोजी आपल्या कार्यकारी मंडळात मजूरमंत्री म्हणून बाबासाहेबांचा समावेश केला.
अपुर्ण...
Thursday, 21 April 2022
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना समितीवरील निवड
संदर्भ-
1. प्रा. डॉ. भाऊ लोखंडे यांचे विविध वृत्तपत्रांत प्रकाशित झालेले लेखन..
2. चां. भ. खैरमोडे लिखित ८ व्या खंडातीलपृ. क्र. १९८ ते २०० वरील उतारे अणि दुर्गावास यांनी संपादित केलेल्या सरदार वल्लभभाई पटेल पत्रव्यवहाराच्या ५ व्या खंडातील भाग
Wednesday, 20 April 2022
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पुतळे
पुतळ्यांचं स्वतःचं एक राजकारण असतं. आज जर शिवरायांचे पुतळे नसते, सम्राट अशोकाने शिलालेख कोरून ठेवले नसते तर कदाचित इतिहासाची पाळंमूळं नष्ट करण्यात कोणतीच कसर ठेवली नसती. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांच्या बाबतीतही नेमकं तेच.या संदर्भातील एक किस्सा ... केनेथ रिगनाल्ड ग्रिफिथ, वेल्श प्रांतातला हरहुन्नरी निर्माता, दिग्दर्शक. त्यानं आपल्या आयुष्यातील बराचसा काळ बीबीसी सारख्या मातब्बर संस्थेला अनेक गाजलेल्या फिल्म्स, डॉक्युमेंटरी बनवून देण्यात मार्गी लावला. पंडीत जवाहरलाल नेहरूंवर बनवलेली त्यांची डॉक्युमेंटरी फिल्म प्रचंड गाजली होती. त्याच धर्तीवर त्यांना इंदिरा गांधींच्या सरकारकडून नेहरूंवर गांधीसारखी फिल्म बनवण्याचं आमंत्रण मिळालं. केनेथ ग्रिफिथ यांनी सारी तयारी करून भारत गाठलं. आणि फिल्म बनवण्याआधी भारत फिरण्याची इच्छा व्यक्त केली. ग्रिफिथ यांनी अख्खा भारत पालथा घातला. नेहरूंच्या कार्याच्या खाणाखुणा शोधण्यासाठी त्यांनी शहरं, गावं पायाखालून घातली. पण त्यांच्या नजरेला वेगळेच चित्र आलं. गावागावात बाबासाहेबांचे पुतळे दिमाखातउभे दिसले. बाबासाहेबांचा अनुयायी वर्ग, त्यांनी केलेलं काम पाहूनकेनेथ इतका प्रभावित झाला की त्यानं स्वतः नेहरूंऐवजी बाबासाहेबांवरच सिनेमा बनवायचा चंग बांधला. तशी इच्छा त्यानं इंदिरा सरकारकडेही बोलून दाखवली. केनेथ पुन्हा इंग्लंडला रवाना झाला. भारतातील भटकंती दरम्यान जमवलेला सर्व डेटा युटीलाईज करून भली मोठी स्क्रिप्ट बनवली. स्टोरी बोर्ड तयार केला. शक्य तितकं कास्टिंग ऑन पेपर तयार ठेवलं. आणि बाबासाहेबांवर सिनेमा बनवण्यासाठी आपण तयार असल्याचे भारत सरकारला कळवलं. पण काय माहीत माशी कुठं शिंकली.. केनेथ ला पुन्हा भारतात येण्यासाठी भारत सरकारकडून व्हीजा मिळालाच नाही. थोडक्यात त्याचा व्हिजा नाकारण्यात आला. त्यानं नंतर बरेच प्रयत्न केले. पण ते सारे व्यर्थठरले. इंटरनेटवर याबाबतीत बरेचसे संदर्भ उपलब्ध आहेत. असो..Sakya Nitin ने यात दिलेली माहीती अजून ताप आणणारी.. ती अशी .."केनेथ ग्रिफिथ यांना चित्रपट बनावन्यास नकार मिळाल्यानंतर त्यांनी 700 भागांची मालिका बनविन्यासाठी काही प्रयत्न केले पण 4-5 वर्षे प्रयत्न केल्यानंतर त्याला देखील नकार मिळाला. दुर्दर्शनचे गोस्वामी नावाचे कोणी अधिकारी त्या फाइलवर कुंडली मारून बसले होते. नंतर जब्बार पटेलांचा सिनेमा आला. बरा होता तो. काही नसल्यापेक्षा असलेलं बरंच म्हणायचं. पण 1936 ते 1951 चा कालखंड अगदी दाखवायचा म्हणून दाखवून टाकला. अनेक चुका होत्या त्या अक्षम्य होत्या. असो..तर बाबासाहेबांच्यापुतळ्यात नेमकं असं काय होतं की केनेथ ग्रिफिथ भारावून गेला असावा.. गाव लागलं की गावाच्या प्रवेशद्वारावरचभविष्याकडे अंगुलिनिर्देश करणारे बाबासाहेब आपल्या नजरेस पडतात. निळा कोट अन् लाल ओठ अशा लहेज्यातील बाबासाहेब आपल्या प्रत्येक पुतळ्यात हातात संविधान, डोळ्यांत प्रचंड आत्मविश्वास, उज्ज्वल भविष्याचा आशावाद, शिका, संघर्ष करा अन् संघटित व्हा चा नारा देताना दिसतात. आज देशभरात गाव तिथं आंबेडकर ही नवी म्हणच रुजलीये.बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रकारची भव्यता आहे. त्यांच्या पुतळ्याच्या स्ट्रक्चरला विशिष्ट आकार आहे. ज्यात पाहणाऱ्याच्या डोळ्यांना एक आदरयुक्त भीतीचा भास होतो. एक जरब बसते. तर कोणत्याही संकटातून उभी राहण्याची उमेद ती आकृती मनात निर्माण करत असते. त्यांच्या पुतळ्याच्या रचनेत असणारं पुस्तक, मगते संविधान असो किंवा अॅनाहिलेशन ऑफ कास्ट हे कायम आपणा सर्वांना लढण्याची, शिकण्याची, संघर्षाची अन् कधीही हार न मानण्याची जिद्द देत असते.आपण त्या पुतळ्यांतून प्रेरणा घ्यायला हवी. तरच बाबासाहेबांना पुतळ्यांत बंदिस्त होण्यापासून आपण वाचवू शकू.. त्यावर होणाऱ्या राजकारणाला आळा घालण्यात यशस्वी होऊ शकू..तुम्हाला जे वाटतंय ते बिंदास व्यक्त व्हा. आपण नवा दृष्टिकोन आत्मसात केला पाहीजे. प्रतिकांकडून प्रेरणा घ्यायची की त्यांना व्यक्तिपुजेत बंदिस्त करायचं हा कळीचा मुद्दा झालाय.
Monday, 18 April 2022
बाबासाहेब अव्वल दर्जाचे ब्रँड गुरू
Sunday, 17 April 2022
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दिलिप कुमार
सदर घटनेच्या संदर्भासाठी माई आंबेडकर लिखित बाबासाहेबांच्यासहवासात हे पुस्तक चाळता येईल.
Saturday, 16 April 2022
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घर
बाबासाहेबांचे सुरवातीचे दिवस अत्यंत कठीण परीस्थितीत गेले. बॅरिस्टर झाल्यानंतर त्यांनी वकिली सुरु केली. आणि अल्पावधीतच त्यांची एक हुशार वकील म्हणून ख्याती चोहीकडे पसरली. आणि 1930 सालानंतर त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत गेली. तेव्हा बाबासाहेबांचं कार्यालय परळच्या दामोदर ह़ॉल जवळ होतं. आता घरी येणाऱ्या जाणाऱ्यांचा राबता वाढला होता. पोयबावाडीतील घर अपूरं पडू लागलं होतं. पुस्तकांची आबाळं होत होती. म्हणून त्यांनी आता स्वतःसाठी नवीन घर बांधण्याचा निश्चय केला.बाबासाहेबांनी स्वतःची इमारत उभी करताना त्यात ग्रंथालय कसे असावे, याचा अभ्यासपूर्ण आराखडा तयार केला होता. परदेशात पाहिलेल्या उत्तमोत्तम ग्रंथालयांची वैशिष्ट्ये आपल्याकडेही असावीत, असा प्रयत्न त्यांनी केला. त्या रचनेत तीन-तीन खोल्यांचे दोन ब्लॉक्स राजगृहाच्या तळमजल्यावर बांधून घेतले होते. त्या दोन ब्लॉक्समध्ये त्यांनी आपल्या कुटुंबीयांच्या राहण्याची व्यवस्था केली होती. राजगृहाच्या पहिल्या मजल्यावर डॉ.बाबासाहेबांनी स्वत:च्या राहण्याच्या सोयीबरोबरच आपल्या प्रिय ग्रंथालयाची आणि कार्यालयाचीही सोय केली होती. त्यांनी स्वत: आराखडा तयार करून त्याप्रमाणे सोयी करून घेतल्या होत्या.१९३० मध्ये त्यांनी दादरच्या हिंदू कॉलनीत ९९ व १२९ क्रमांकाचे प्रत्येकी ५५ चौरस यार्ड क्षेत्रफळाचे दोन प्लॉट खरेदी केले. पाचव्या गल्लीतील १२९ क्रमांकाच्या प्लॉटवर आपल्या कुटुंबीयांबरोबरराहण्यासाठी इमारत बांधण्याचे ठरवलं तर तिसर्यागल्लीतील ९९ क्रमांकाच्या प्लॉटवर भाड्याने देण्यासाठीची इमारत बांधण्याचे नक्की केले. बांधकामासाठी त्यांनी सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाकडून कर्ज मिळवले आणि तात्काळ बांधकाम सुरू केले. बांधकामावर देखरेख करण्याचे कामास श्री. आईसकर यांना नेमले होते. १९३१ सालच्या जानेवारी महिन्यात १२९ क्रमांकाच्या प्लॉटवर राहण्याच्या वास्तूचे बांधकाम सुरू केले. ते बांधकाम १९३३ मध्ये पूर्ण होऊन "राजगृह' ही राहण्याची वास्तू तयार झाली.प्लॉट क्रमांक ९९ वर दुसर्या इमारतीचे बांधकाम १९३२ मध्ये सुरू झाले. ते बांधकाम पूर्ण झाल्यावर त्यांनी त्या इमारतीचे नाव "चार मिनार' असे ठेवले. "राजगृह' हे नाव हिंदू संस्कृती आणि बौद्ध संस्कृतीशी संबंधित होते, तर "चार मिनार'हे नाव मुस्लिम संस्कृतीशी संबंधित होते. इमारतीचे प्रत्यक्ष बांधकाम १९३१ च्या जानेवारी महिन्यात सुरु होऊन ते सन १९३३ मध्ये पूर्ण झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या कुटुंबीयांसह "राजगृह' या आपल्या सुंदर व प्रशस्त वास्तूत राहण्यास आले होते. पुढे ग्रंथांच्या खरेदीच्या आणि इतर गोष्टींच्या कर्जाची फेड करण्यासाठी ९ मे १९४१ रोजी त्यांनी "चार मिनार' ही इमारत विकली. मात्र "राजगृह' ही वास्तू त्यांनी कायम आपल्या मालकीची ठेवली.
Friday, 15 April 2022
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे शिक्षण
किती शिक्षण अन् किती पदव्या जवळ असतीलतर त्यास स्कॉलर म्हणता येईल? पीएचडीसाठी अपीयर होणं हे स्कॉलर असल्याचं लक्षण मानता येईल का? तर बाबासाहेबांचं शिक्षण पाहूयात आपण.बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठात असताना विद्यापीठाच्या ग्रंथालयात अठरा तास बसत असत. ग्रंथालयातील बुक न् बुक त्यांनी चाळलं होतं. कोलंबिया विद्यापीठाच्या तीन वर्षाच्या वास्तव्यात त्यांनी अनुक्रमे
1. अर्थशास्त्रातील29 पदवी अभ्यासक्रम पूर्ण केले.
2. इतिहासातील वेगवेगळ्या 11 अभ्याक्रमांची पूर्तता केली.
3. सोशियोलॉजी मध्ये सहा कोर्सेस केले.
4. अँथ्रोपोलॉजी मध्ये चार
5. पॉलिटिक्स मध्ये तीन
6. आणि फ्रेंच तसंच जर्मन भाषांचा एकेक कोर्स पूर्ण केला.तर बाबासाहेबांनी 2 वर्षे 11 महिने 18 दिवसांच्या कालावधीत एकुण 55 शाखांचा अभ्यास पूर्ण केला. थोडक्यात 55 कोर्सेस पूर्ण केले. इथं आम्ही बीए करण्यासाठी तीन वर्षे वाया घालवतो.हा प्रवास फक्त त्यांचा कोलंबिया विद्यापीठातलाच.इंग्लंडमधला अजून बाकी आहे.
विद्वान कोणाला म्हणावं बरं? नव्या वाटा चोखाळणाऱ्या माणसाला की, रि-सर्च करून नाव मिळवणाऱ्या माणसाला.. बाबासाहेबांचं कोलंबियाचं शिक्षण तर पाहीलंच. आता जरा त्यांच्या शिक्षणातील महत्त्वाच्या अचिव्हमेंट्स पाहू.1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागास जातीतील पहिले वकिल होते.
2. डॉ. आंबेडकर हे असे पहिले भारतीय होते की ज्यांनी कोणत्याही परदेशी विद्यापीठात अध्ययन करून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली होती.
3. बाबासाहेब स्वतः संस्कृत भाषापंडित होते. आणि ही भाषा ते जिद्दीने स्व-अध्ययन करून शिकले. अस्पृश्यांना संस्कृत भाषा शिकण्याचा अधिकार नव्हता.
4. बाबासाहेब 1907 साली मॅट्रिकची परिक्षा पास झाले. त्या परिक्षेत त्यांना 750 पैकी फक्त 280 गुण मिळाले. ते 280 गुण प्रचंड मोठे होते. कारण महारांमधून मॅट्रिक होणारा पहिला विद्यार्थी म्हणजे डॉ. आंबेडकर...
5. मे-१९१६ मधे डॉ. गोल्डनवेझर यांच्या सेमीनारमधे “Caste In India, Their Mechanism, Genesis & Development ह्या विषयावरत्यानी एक निबंध वाचला. या निबंधानं अमेरिकेतली बुद्धिजीवी वर्गात प्रचंड खळबळ माजवली. जातीव्यवस्थेच्या या क्रुरपणाचा अमेरिकेतील विद्यापीठातून जाहीर निषेध होण्याची पहिलीच वेळ होती.बाबासाहेबांमुळेभारतीय समाजव्यवस्थेची किड जगासमोर आली.
6. जुन-१९१६ ला “National Dividend of India-A Historical & Analytical Study हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर केला. ह्या प्रबंधाने प्रभावित झालेल्या कोलंबियातील लोकांनी त्यांच्या नावे शानदार मेजवानीचं आयोजन देखील केलं होतं. आणि स्वतःच्याच देशात मात्र अपमान पदरी पडला.
7. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून डी. एस्सी. म्हणजे डॉक्टरेट ऑफ सायंस मिळवणारे बाबासाहेब हे भारतातील पहिले व्यक्ती.
8. समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र,कायदा आणि तत्त्वज्ञान ह्या सहा क्षेत्रांत बाबासाहेबांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं.
9. वरिल सहाही क्षेत्रात त्यांनी प्रबंध सादर करून डॉक्टरेट मिळवल्यात. त्यांनी सादर केलेले प्रबंध इतके महत्त्वाचे होते की त्याकाळी ब्रिटनमधल्या टॉपमोस्ट प्रकाशकांनी ते प्रबंध पुस्तकरुपाने प्रकाशित केले. त्यातील कित्येक प्रबंध आज पन्नासहून अधिक आवृत्त्या निघूनही पुन्हा पुन्हा प्रकाशित होत आहेत.
10. बाबासाहेबांच्याइंग्रजी भाषेचे खरे गुरू हे त्यांचे वडिलच होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अर्थव्यवस्था
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचे नेते म्हणून संकुचित करण्यातदेशातील माध्यमांनी जी मोलाची मेहनत घेतलीये त्याला तोड नाही. त्यामुळे राष्ट्रनिर्मितीत त्यांचं असलेलं योगदान केवळ अनुल्लेखानेच टाळले गेले आहे.दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर ब्रिटीशांनी भारतातून पाय काढता घेतला. तशी सत्तेच्या हस्तांतरणाची प्रोसेस ही 1943 सालीच सुरू झाली होती. परंतू दुसऱ्या महायुद्धाचा बराचसा फटका तत्कालीन भारतीय अर्थव्यवस्थेला बसला होता. यासंबंधी ब्रिटीश सरकार भारतातील अनेक विद्वानांची चाचपणी करत होते. त्याच सुमारास बाबासाहेबांची बीबीसी ला प्रदीर्घ अशी मुलाखत झाली. त्यात त्यांनी गांधीजी आणि फ्री मार्केट पॉलिसी, जगातली युद्धखोरी, 1945 साली भरलेल्या ब्रेटनवुड परिषदेत घडलेल्या गोष्टींचे जागतिक अर्थव्यवस्थेवर उमटणारे पडसाद, गोल्ड स्टँडर्ड, करंसी, ऑईल पॉलिटिक्स, पाकिस्तान सारख्या विषयांवर सडेतोड मत व्यक्त केलं. त्यात ते असं म्हणून गेले की, गांधी प्रणित काँग्रेस ने कधीच फ्री मार्केट पॉलिसीला होकार दिलेला आहे त्यामुळे ब्रिटीशांना आता भारतात राहून वसाहती कंट्रोल करण्याची आवश्यकता नाही. त्या मुलाखतीने भारतीय राजकारणात प्रचंड खळबळ माजवली होती. आता बाबासाहेबांशी उघड पंगा घ्यायला भले भले कचरू लागले होते. खरं तर 1936 ते 1953 हा तब्बल अठरा वर्षांचा कालखंड त्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा आणि सर्वोच्च योगदान असलेला कालखंड.दूर्दैवाने पटेलांसहित सर्व दिग्दर्शकांनी बनवलेल्या चित्रपटांत हा कालखंड दाखवलेलाच नाही. असो...भारत स्वतंत्र झाला. बाबासाहेबांकडे संविधानाच्या निर्मितीसोबतचयुद्धपश्चात स्थितीतील अर्थव्यवस्था उभारण्याचे कामही आले. यात शेतीत सुधारणा, शेती- आधारित उद्योगांची नव्याने उभारणी, बांधणी, अस्तित्वात असलेल्या उद्योगांचे जतन, डबघाईला आलेल्या क्षेत्रांचे पुनर्वसन करण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर आली. याचं सिस्टमायझेशन करण्यासाठी बाबासाहेबांनी दोन महत्त्वाच्या संस्था उभारल्या.
1. Reconstruction Committee of Council (RCC)
2. Planning Commision
यातील पहिली आर.सी.सी. चे बाबासाहेब स्वतः सदस्य राहीले. आणि त्यातून उभी केलेल्या पॉलिसी कमीटी फॉर इरिगेशन अँड पॉवर या दुसऱ्या सब-कमिटीचे ते अध्यक्ष होते. स्वातंत्र्यानंतर उभ्या राहीलेल्या अर्थव्यवस्थेचा सांगाडा बनवण्याचे काम हे बाबासाहेबांचेच.भारतीय चलनाचा दर स्टेबल आणि निश्चित ठेवण्यात त्यांनी 1953 पर्यंत यश मिळवलं. भाक्रा नांगल धरण, हिरकूड प्रकल्प, महानदी प्रकल्प हे सारं काही त्यांचंच देणं. शेती अन् शेतजमीनींचं राष्ट्रीयकरण करण्याची योजना सुद्धा त्यांचीच. उभारलेल्या धरणांतून उपसा सिंचनाद्वारे वीज निर्मिती शक्य करून दाखवणारे सुद्धा बाबासाहेबच होते. थोडक्यात काय... तर पाणी, शेती, शेतीवर आधारित उद्योग, इतर उद्योगधंदे, आरसीसीची स्थापना, आरबीआयची स्थापना, प्लानिंग कमीशन, पॉलिसी कमीशन असं बरंच काही देऊन आपली अर्थव्यवस्था त्यांनी नव्याने उभी केली.
बाबासाहेबांचं अर्थशास्त्राचं ज्ञान अगाध होतं. त्यांना स्टॉक मार्केट च्या एकुण कारभारात विशेष रस होता. सुरूवातीच्या काळात म्हणजेच 1915 नंतर अर्थार्जनासाठी त्यांनी शिकवण्या घेण्यास सुरूवात केली होती. ती अतिशय अल्प कालावधीची गोष्ट असल्याने त्याची नोंद फारशी घेतली गेलेली नाही. परंतू अधिक पैसे मिळवायचे असतील तर सोबतीला अजून एखादा धंदा सुरू करण्याचा विचार त्यांच्या डोक्यात रुजत होता.अखेरीस त्यांनी कंपनी काढण्याचा निर्णय घेतला. फोर्ट मध्ये दलाल स्ट्रिट जिथं सुरू होतो.. त्याच्या अगदी डाव्या बाजूच्या लेन मधून बाहेर पडल्यानंतर पेन चं दुकान लागतं त्याच्या मागच्या बाजूस बाबासाहेबांनी कंपनीचं ऑफिस थाटलं. आता त्या ठिकाणी आयसीआयसीआयचीबिल्डींग उभी आहे. कंपनीचं नाव होतं..'स्टॉक्स अँड शेअर्स अॅडव्हाझर्स'.कंपनीचं कार्य़ालय सुरू झालं. आणि अवघ्या दहाएक दिवसांतच भीमराव नावाचा एक कंसल्टंट जबरदस्त बुद्धिमान माणूस आहे. त्याचा सल्ला खुप फायदा मिळवून देणाऱा असल्याची बातमी चारो-ओर पसरली. दलाल स्ट्रीटवरील शेटजी-लाटजी भीमरावांकडे सल्ला मागण्यासाठी रांगा लावून उभे राहत होते. आजूबाजूच्या अनेकांची दुकानं थंड पडली. पण शेवटी व्हायचं तेच झालं... कुठूनतरी बातमी लागली की भीमराव नावाचा हा माणूस अस्पृश्य आहे, त्याची कचेरी ही धेडाची कचेरी आहे म्हणून.. बस्स त्या दिवसापासून तिथं कुणी ढूंकून पहायला ही तयार झालं नाही. अखेरीस भीमरावांनी वैतागून ती कचेरी बंद केली अन् पुढील शिक्षणासाठी परदेशी रवाना झाले. अन् जेव्हा ते परत आले तेव्हा भीमरावांचा... डॉ. बी. आर. आंबेडकर झालेले होते.संदर्भासाठी चांगदेव भवानराव खैरमोडे लिखित डॉ. भीमराव रामजी आंबेडकर खंड १ चाळता येईल. मला आता पान क्रं. नीटसं लक्षात नाही. पण पान क्रमांक १०२, किंवा आसपास मिळायला हरकत नसावी. हा काळ 1917 च्या सुमारासचा असावा.
Thursday, 14 April 2022
डॉ बाबासाहेब आंबेडकर- फॅशन स्टेटमेंट
Sunday, 18 June 2017
भारतीय नोकरशहा
भ्रष्टाचारी देशात भारताला अग्रस्थानी आणण्याचे काम करणाऱ्या नोकरशहांची लाचखोरी ही एखाद्या भिकाऱ्याला लाजविण्यासारखी आहे. एकप्रकारे भारताच्या प्रगतीचे द्वार हे या नोकरशहांनी बंदच केले आहे.
आपल्या ऐशोआरामावर लाखो पैसे खर्च करणारे हे महाभाग पोटाच्या दाण्यासाठी हात पुढे करणाऱ्या भिकाऱ्याच्या हातात एक रूपया घालायला सुद्धा त्यांचे हात चुंबकाप्रमाणे ओढल्याप्रमाणे मागे येतात. आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण करून आकाशही ठेंगणे करणाऱ्या या नोकरशहांनी दोन वेळच्या दाण्यासाठी भटकणाऱ्यांना या जमिनीवर वितभर जागासुध्दा शिल्लक ठेवली नाही.
एकंदरीत भारत अविकसित असण्यात या मंडळीचा मोलाचा वाटा आहे.
-महेश तेजराम हातझाडे
(प्रकाशित दैनिक देशोन्नती, दि. ७ जुलै २००८)