Showing posts with label माझ्या कविता. Show all posts
Showing posts with label माझ्या कविता. Show all posts

Thursday, 18 July 2019

माझे आयुष्य

हदयाच्या ओठांनी हसते माझे आयुष्य।
स्वतःच स्वतः च्या श्वासांनी, फुलते माझे आयुष्य..।।

चमकता दिवस आणि निजवणारी रात्र आहे।
आशिर्वादांनी दररोज सावरते माझे आयुष्य..।।

चंद्र आहे, सूर्य आहे, चांदण्या मौजेत आहेत।
रात्रीलाही रंग उधळते माझे आयुष्य..।।

जे मनात आहे ते सगळे घडतआहेत।
स्वप्न मनातले उतरवूनच संपून जावे माझे आयुष्य..।।

निसर्ग सगळं काही, तोच सर्वेसर्वा आहे।
निसर्गासम प्रत्येक क्षण, सजेल तेच माझे आयुष्य..।।

Thursday, 27 June 2019

एक विचार निघून गेला?

झोप उडवून आयुष्य विखरून गेला,
आश्वासन देऊन जेव्हा विचार निघून गेला।

सुखाला जेव्हां तडपतांना पाहिलयं,
डोळ्यातील अश्रूंनी हदय भरून गेला।

केले किती प्रश्न मला आरस्याने,
जेव्हां देह पहायला त्याला गेला।

तोंडातील शब्द केव्हाच गोठून गेले,
जेव्हा तो विचार अलगद निघून गेला।

उतरवले काही शब्द मी कागदावर,
तेव्हा तो विचार अलगद निजवून गेला।

✍ महेश तेजराम हातझाडे

Saturday, 13 August 2016

प्रितीचा हुंदका


तुझी प्रित जेव्हा उसळते लाटांसारखी,
झुरते हे सारे जग फक्‍त तुझ्यासाठी
जेव्हा रंगवतेस हात मेहंदीने कधी,
हुंदके आवरत सावरतो फक्त तुझ्यासाठी

-महेश हातझाडे

Friday, 5 February 2016

-: दुषित शिक्षण गंगा:-

महाविद्यालयात बघा
मोबाईलचा फिवर आहे।
शिक्षणाच्या नावाखाली
 हातात फक्त पुस्तक आहे।

 महाविद्यालयीन जीवन
 नुसत टाईमपास असतं।
 मुलांच लक्ष मुलींवर
 तर मुलींच  मुलांवर असतं।

 प्रार्थनेच्या वेळी फक्त
 तनाने रांगेत असतात।
 तोंडाने राष्ट्रगीत
 तर मनाने प्रेमगीत गातात।

 वर्गात शिकवण्याकडे
 लक्ष काही लागत नाही।
मँडमच्या मोकल्या केसावरून
 नजर काही हटत नाही।

 गुरूजी आणि सरांमध्ये
फार मोठा फरक आहे।
गुरूजी घालतात गांधी टोपी
 तर सरांच्या अंगात जिन्स पँन्ट आहे।

 बाईजी आणि मँडम मध्ये
 फार मोठी तफावत आहे।
बाईजीचा गणवेश साधा
 तर मँडमचा माँडेलसारखा आहे।

 गुरूजींना वर्गातील मुलं
 त्यांची मुलं वाटायची।
त्यांच्या हितामध्येच
त्यांचे समाधान असायचं।

आजचे सर जी तर मुलींना
'दिल की धड़कन' मध्ये बसवतात।
नऊ महिन्याच्या अगोदरच
जो बाला जो जो रे जो म्हणतात।

 शिक्षणातील मोह-यांची बघा
 नैतिकता किती ढासळलेली आहे।
पाश्चात्य संस्कृतीने बघा
 'शिक्षणगंगा' कशी दुषीत झाली आहे।
                           -महेश हातझाडे