Sunday, 18 June 2017

भारतीय नोकरशहा

भारतातील नोकरशहा हे पुस्तकी किडे असतात. त्यांच्या हिशोबात माणसासाठी नियम नाही तर नियमांसाठी मनुष्य आहे. एखाद्या नववधूच्या हातावरील मेहंदीप्रमाणे त्यांचे हात लाचेने व भ्रष्टाचाराने रंगले आहे. आवश्यक तेवढे वेतन (गलेलठ्ठ) वेतन मिळत असूनही एखाद्या राक्षसाला लाजवेल अशी त्यांची वेतनवाढीची भुक आहे. भारतातील महागाई ची झळ सर्वात जास्त सर्वसामान्यांना बसत असते.पण पर्वताएवढे वेतन असणाऱ्या नोकरशहाला बसत नाही. वेतनवाढीमूळे आर्थिक भेत वाढत जाते. समाजात पैशाच्या बिछान्यावर झोपणाऱ्यांचे पारडे जड तर दाण्यासाठी हात पुढे करणाऱ्यांचे पारडे हलके राहून फक्त श्रीमंत आणि गरिब यांची दरी वाढल्यामुळे संविधानात असलेली जातीवार आरक्षणाची नोंद काढून ती आर्थिक स्तरावर केल्याशिवाय पर्याय राहणार नाही.

भ्रष्टाचारी देशात भारताला अग्रस्थानी आणण्याचे काम करणाऱ्या नोकरशहांची लाचखोरी ही एखाद्या भिकाऱ्याला लाजविण्यासारखी आहे. एकप्रकारे भारताच्या प्रगतीचे द्वार हे या नोकरशहांनी बंदच केले आहे.

आपल्या ऐशोआरामावर लाखो पैसे खर्च करणारे हे महाभाग पोटाच्या दाण्यासाठी हात पुढे करणाऱ्या भिकाऱ्याच्या हातात एक रूपया घालायला सुद्धा त्यांचे हात चुंबकाप्रमाणे ओढल्याप्रमाणे मागे येतात. आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण करून आकाशही ठेंगणे करणाऱ्या या नोकरशहांनी दोन वेळच्या दाण्यासाठी भटकणाऱ्यांना या जमिनीवर वितभर जागासुध्दा शिल्लक ठेवली नाही.

एकंदरीत भारत अविकसित असण्यात या मंडळीचा मोलाचा वाटा आहे.

-महेश तेजराम हातझाडे

(प्रकाशित दैनिक देशोन्नती, दि. ७ जुलै २००८)

No comments:

Post a Comment