Friday 15 April 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे शिक्षण

किती शिक्षण अन् किती पदव्या जवळ असतीलतर त्यास स्कॉलर म्हणता येईल? पीएचडीसाठी अपीयर होणं हे स्कॉलर असल्याचं लक्षण मानता येईल का? तर बाबासाहेबांचं शिक्षण पाहूयात आपण.बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठात असताना विद्यापीठाच्या ग्रंथालयात अठरा तास बसत असत. ग्रंथालयातील बुक न् बुक त्यांनी चाळलं होतं. कोलंबिया विद्यापीठाच्या तीन वर्षाच्या वास्तव्यात त्यांनी अनुक्रमे

1. अर्थशास्त्रातील29 पदवी अभ्यासक्रम पूर्ण केले.

2. इतिहासातील वेगवेगळ्या 11 अभ्याक्रमांची पूर्तता केली.

3. सोशियोलॉजी मध्ये सहा कोर्सेस केले.

4. अँथ्रोपोलॉजी मध्ये चार

5. पॉलिटिक्स मध्ये तीन

6. आणि फ्रेंच तसंच जर्मन भाषांचा एकेक कोर्स पूर्ण केला.तर बाबासाहेबांनी 2 वर्षे 11 महिने 18 दिवसांच्या कालावधीत एकुण 55 शाखांचा अभ्यास पूर्ण केला. थोडक्यात 55 कोर्सेस पूर्ण केले. इथं आम्ही बीए करण्यासाठी तीन वर्षे वाया घालवतो.हा प्रवास फक्त त्यांचा कोलंबिया विद्यापीठातलाच.इंग्लंडमधला अजून बाकी आहे. 

विद्वान कोणाला म्हणावं बरं? नव्या वाटा चोखाळणाऱ्या माणसाला की, रि-सर्च करून नाव मिळवणाऱ्या माणसाला.. बाबासाहेबांचं कोलंबियाचं शिक्षण तर पाहीलंच. आता जरा त्यांच्या शिक्षणातील महत्त्वाच्या अचिव्हमेंट्स पाहू.1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागास जातीतील पहिले वकिल होते.

2. डॉ. आंबेडकर हे असे पहिले भारतीय होते की ज्यांनी कोणत्याही परदेशी विद्यापीठात अध्ययन करून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली होती.

3. बाबासाहेब स्वतः संस्कृत भाषापंडित होते. आणि ही भाषा ते जिद्दीने स्व-अध्ययन करून शिकले. अस्पृश्यांना संस्कृत भाषा शिकण्याचा अधिकार नव्हता.

4. बाबासाहेब 1907 साली मॅट्रिकची परिक्षा पास झाले. त्या परिक्षेत त्यांना 750 पैकी फक्त 280 गुण मिळाले. ते 280 गुण प्रचंड मोठे होते. कारण महारांमधून मॅट्रिक होणारा पहिला विद्यार्थी म्हणजे डॉ. आंबेडकर...

5. मे-१९१६ मधे डॉ. गोल्डनवेझर यांच्या सेमीनारमधे “Caste In India, Their Mechanism, Genesis & Development ह्या विषयावरत्यानी एक निबंध वाचला. या निबंधानं अमेरिकेतली बुद्धिजीवी वर्गात प्रचंड खळबळ माजवली. जातीव्यवस्थेच्या या क्रुरपणाचा अमेरिकेतील विद्यापीठातून जाहीर निषेध होण्याची पहिलीच वेळ होती.बाबासाहेबांमुळेभारतीय समाजव्यवस्थेची किड जगासमोर आली.

6. जुन-१९१६ ला “National Dividend of India-A Historical & Analytical Study हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर केला. ह्या प्रबंधाने प्रभावित झालेल्या कोलंबियातील लोकांनी त्यांच्या नावे शानदार मेजवानीचं आयोजन देखील केलं होतं. आणि स्वतःच्याच देशात मात्र अपमान पदरी पडला.

7. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून डी. एस्सी. म्हणजे डॉक्टरेट ऑफ सायंस मिळवणारे बाबासाहेब हे भारतातील पहिले व्यक्ती.

8. समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र,कायदा आणि तत्त्वज्ञान ह्या सहा क्षेत्रांत बाबासाहेबांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं.

9. वरिल सहाही क्षेत्रात त्यांनी प्रबंध सादर करून डॉक्टरेट मिळवल्यात. त्यांनी सादर केलेले प्रबंध इतके महत्त्वाचे होते की त्याकाळी ब्रिटनमधल्या टॉपमोस्ट प्रकाशकांनी ते प्रबंध पुस्तकरुपाने प्रकाशित केले. त्यातील कित्येक प्रबंध आज पन्नासहून अधिक आवृत्त्या निघूनही पुन्हा पुन्हा प्रकाशित होत आहेत.

10. बाबासाहेबांच्याइंग्रजी भाषेचे खरे गुरू हे त्यांचे वडिलच होते. 

1 comment:

  1. हातझाडे सर, बाबासाहेबांना देशामध्ये देशामध्ये अपमानित करण्याचे काम इथल्या धर्मव्यवस्थेनं केल. इथली व्यवस्था गोट्याला देव मानायला तयार होती परंतु विद्वान मानसाला शिक्षीत मानायला सुद्धा तयार नव्हती. तेव्हाही देशात दोनच वाद किंवा विचार होते एक समानता, मानवता आणि लोकशाहीचा तर दुसरा वर्णव्यवस्था भेदाभेद उच्च निच वगैरे मानणारा. जो वर्ग समानता ,मानवता आणि लोकशाही यांचे समर्थन करत नाही त्यांनी बाबासाहेब लोकांपर्यत पोहचूच दिला नाही.. आरोप केला जातो की त्यांच्या लोकांनी बाबासाहेब आपल्या पुरता मर्यादित ठेवला वगैरे... पण आज तुम्हाला कुणी रोकलय, इंटरनेटवर सर्व उपलब्ध असताना हा आरोप चालणार नाही आणि खर सांगु लोकांना भिती वाटते की आम्ही जर बाबासाहेबाबद्दल वाचले तर कदाचित आम्हाला समाजातील लोकांची टिका सहन करावी लागेल कारण जो बाबासाहेब वाचतो तो ओरडतो आपल्या हक्कासाठी, आपल्या न्यायासाठी, समाजातील सुरु असलेल्या वाईट चालीरीती विरुद्ध... लोकांमध्ये या सर्वांकरीता बंड करण्याची हिम्मत इथल्या व्यवस्थेन तयार होऊ दिली नाही.. बाबासाहेबांचे सर्व लेख फक्त इंग्रजीत आहेत याचे कारणही तेच आहे.. जो बुद्धीवादी समाज आहे त्यानी बाबासाहेब वाचला आहे.. ते त्यांचे विचार अंगीकारतातही...आज बाबासाहेबांच्या विचारांची देशाला फार गरज आहे, जर असे झाले नाही तर पुढला काळ फार कठीण येणार आहे हे मात्र नक्की

    ReplyDelete