Showing posts with label वात्रटिका. Show all posts
Showing posts with label वात्रटिका. Show all posts

Wednesday, 13 March 2019

पळवापळवी

निवडणुकीच्या तोंडावर,
मुलांची पळवापळवी सुरू झाली.
सत्तेसाठी बापालाही,
लाथ मारण्याची प्रथा सुरू झाली.

सत्ता उपभोगण्यासाठी,
ऐनवेळी निष्ठा बदलत जात आहे.
प्रगल्भ लोकशाहीसाठी,
अशी निष्ठाबदल धोकादायक आहे.

Monday, 18 February 2019

दहशतवाद

अजून किती बलिदान द्यायचे,
विचार करणे गरजेचे आहे..।
पाकसमर्थित आतंकवाद,
आता संपविणे गरजेचे आहे..।

पण किड खोडाला लागली असून,
फवारणी पानांवर सुरू आहे..।
दहशतवाद मुळासकट संपविण्यासाठी,
घाव मुळावर घालणे गरजेचे आहे..।

Saturday, 29 September 2018

थापा

अगोदर प्रतिगामी माणसे,
भरपुर थापा मारत होते..।
आता फुरोगामी माणसेही,
थापा मारायला लागले आहेत..।

फुरोगामी थाप तेवढी खरी आहे,
मान्य करण्याची जबरदस्ती आहे..।
पण तंत्रज्ञानाने संदर्भहिन थाप,
आता उघडी पडायला लागली आहे..।

Tuesday, 29 May 2018

Whatsapp University

अर्धवट ज्ञानाच्या भरवशावर सगळे,
विद्वान पंडित झाल्यासारखे वागतात।
Whatsapp university चे पदवीधर,
इतिहास संशोधक झाल्यासारखे वागतात।

भरपूर फुगलेल्या मुर्खांच्या बाजारात,
Whatsapp मुळे भर पडत आहे...।
तंत्रज्ञानाने ज्ञान कक्षा रूंदावण्यापेक्षा,
आणखी संकुचित होत आहे..।

✍ महेश तेजराम हातझाडे, धाबेटेकडी

Wednesday, 3 January 2018

झेंड्याचे पराक्रम

कुणी भगव्या झेंड्याखाली...,
आपल्या पराक्रमाच्या गोष्टी सांगतो।
कुणी हिरव्या झेंड्याखाली...,
आपल्या संस्कृतीच्या गोष्टी सांगतो।

कुणी निळ्या झेंड्याखाली...,
आपल्या शौर्य कथा सांगतो।
सैनिकच तिरंगा झेंड्याखाली..,
देशाभिमानाच्या गोष्टी सांगतो?

Thursday, 28 September 2017

देवांचा बाजार

श्रध्देच्या नावाखाली,
देवाचा बाजार मांडला जाते।
अंधश्रध्देमुळे भक्तांना,
भरदिवसा लुटले जाते।

जास्तीचे पैसे असतील तर,
देवदर्शन शुलभ असते।
पैशाअभावी गरिबांना,
पायऱ्या झिजवावे लागते।

✍महेश तेजराम हातझाडे

Saturday, 12 August 2017

संविधान व धर्म

भारतात अधिकार हवे असल्यास,
संविधानाचा आधार घेतला जाते।
संविधानातील जबाबदारी पाळतांना,
धर्मिक बाबीचा बागुलबुवा केला जाते।

धर्मातील धार्मिकता जपतांना,
संविधानातील जबाबदारी पाळली पाहिजे।
स्वार्थासाठी संविधान व धर्माचा,
लपंडाव टाळता आला पाहिजे।

✍महेश तेजराम हातझाडे

Monday, 7 August 2017

फ्रेंडशिप डे आणि रक्षाबंधन

फ्रेंडशिप डे आणि रक्षाबंधन,
योगायोगाने एकापाठोपाठ आला।
परकीय व भारतीय संस्कृतीचा,
योगायोगाने मिलाफ झाला।

एकपाठोपाठ दोन्ही आल्याने,
महाविद्यालयीन मुलांची गोची झाली।
हातात धागा गर्लफ्रेंडचा की बहिणीचा,
समजण्यातच डोकी फिरू लागली।

✍ महेश तेजराम हातझाडे

Friday, 28 July 2017

समृध्द शेतकऱ्यासाठी

कर्जमाफी झाल्यामुळे,
ओझे कमी झाले आहे.
पाणी पडत नसल्यामुळे,
रोवणी खोळबंली आहे.

तात्पुरत्या दिलास्यासाठी,
कर्जमाफी ठिक आहे.
शेतकऱ्याच्या समृध्दतेसाठी,
सिंचनाची सोय आवश्यक आहे.

Saturday, 11 February 2017

इतिहास

इतिहास घडविण्यासाठी लढणारे,
घडलेल्या इतिहासावर लढत आहेत.
इतिहासातूंन बोध घेणे सोडून,
इतिहासातच वेळ घालवत आहेत.

इतिहासासोबत खेळणे सोडून,
खरा इतिहास लिहला पाहिजे
नवा इतिहास घडविण्यासाठी,
इतिहासाचे अवलोकन झाले पाहिजे.

-महेश तेजराम हातझाडे

Friday, 10 February 2017

भेदभावमुक्त समाज

जाती निर्मुलनासाठी लढणारे,
जात व्यवस्था मजबूत करत आहेत।
धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारणारे,
लोकांना धर्मा धर्मात विभागत आहेत।

देशात समानता येण्यासाठी,
जात धर्म स्वतःपुरते मर्यादित पाहिजे।
मानव जातीच्या कल्याणासाठी,
माणुसकी नावाचा धर्म जपला पाहिजे।

-महेश तेजराम हातझाडे

शहाणपण

कुणी आपणाला शहाणपणा शिकवेल,
एवढे आपले वर्तन मुर्खपणाचे नसावे।
कुणी आपणाला दिडशहाणा म्हणेल,
एवढे अती शहाणपणाचे पण नसावे।

जीवनातील उन्हाळे पावसाळे बघत,
अनुभवातून शहाणपण आले पाहिजे।
आपल्याच ओठांनी व श्वासानी अनुभवाने,
शहाणपणाची बासरी सुरात वाजली पाहिजे।

-महेश तेजराम हातझाडे

Thursday, 9 February 2017

शरिर आणि खेळ

दिवसभर मनशोक्त खेळणारे,
लहान मुले मोबाईल मध्ये घुसले.
काल्पनिक व्हिडीयो गेम खेळून,
पारंपारिक खेळच विसरले.

ज्ञानकक्षा रूंदावण्यासाठी,
तंत्रज्ञानही आवश्यक आहे.
सुदृढ आणि निरोगी आयुष्यासाठी,
शरिराला व्यायामाची गरज आहे.

-महेश तेजराम हातझाडे

Wednesday, 8 February 2017

व्हँलेंटाईन डे

बारा महिण्याच्या एवढ्या दिवसात,
प्रेम करायला वेळ मिळत नाही.
प्रेम करायला व्हँलेटांईनची वाट पाहून,
इथल्या पोरांचे डोळे थकत नाही.

सगळे दिवस येथिल माय बहीणीवर,
ह्या प्रेमळ पोरांनी प्रेम केले पाहिजे.
वर्षाच्या तिनशे पासष्ट दिवसही,
व्हँलेटांईन डे साजरा झाला पाहिजे.

-महेश तेजराम हातझाडे

Tuesday, 7 February 2017

पदवीधर

आमच्या देशातील पदवीधर
कीती उच्च कोटिचे आहेत.
मतदान करायला गेले तरी,
त्यांची मते अवैध ठरत आहेत.

देशातील शिक्षणाचा दर्जा,
बघा किती खालावला आहे.
मतदान करता न येणारा पदवीधरही
अडाण्या पेक्षा अडाणी आहे.

-महेश तेजराम हातझाडे

बागेतील फुले

बागेतील फुले कसे,
सुगंध देत असतात.
अल्प आयुष्य तरी,
हसत जीवन जगतात.

मानव जातीनेही,
फुलांसारखे जगले पाहिजे.
स्वतासाठी जगूनही,
इतरासाठी झिजले पाहिजे.

-महेश तेजराम हातझाडे

Monday, 6 February 2017

इतिहासातील लुडबूड

इतिहासाची जाणिव नसलेले,
इतिहासकार पण असतात.
मनोरंजनाच्या नावाखाली,
इतिहासासोबतच खेळतात.

प्रेरणा अनं स्फुर्ती मिळण्यासाठी,
ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे.
टिआरपी वाढविण्याठी असलेली,
इतिहासातील लुडबूड थांबली पाहिजे.

-महेश तेजराम हातझाडे

Thursday, 19 January 2017

...शेवटी मातीतच.

शेकडो गावात दरारा असून,
ओळखणारे पण भरपूर आहेत.
उचलण्या तिरडी तुझ्या प्रेताची,
चार माणसे पुरेशे आहेत.

नावावर शेकडो एकर जागा,
पण तीही उपयोगाची नाही.
सहा फुटात झोपायचे आहे,
कमविलेली संपत्ती कामाची नाही.
~महेश तेजराम हातझाडे

Wednesday, 18 January 2017

बापू...!!

बापू तुम्ही सांगीतलेल्या मार्गावर,
कुणीही चालण्यास तयार नाही.
तुमच्या नावाचे लेबल मात्र,
लावण्यास कुणीही  विसरत नाही.

सर्व जगाने स्विकारले तुम्हाला,
तुमच्याच मार्गावर चालत आहे.
तुमच्या घरी गांधीजी कुणाचे?
यावर वादविवाद सुरू आहे.

-महेश तेजराम हातझाडे

Tuesday, 17 January 2017

खोटे डोईजड झाले

आनंदाचे क्षण कमी असले तरी,
लोकांच्या मनी अपेक्षा भरपुर आहे.

सत्याशी सामना कठीण असले तरी,
सभोवताली खोट्यांची जास्त ओळख आहे.

-महेश तेजराम हातझाडे