Monday 25 April 2022

बाबासाहेब - एक परफेक्ट स्ट्रॅटेजीस्ट…

बाबासाहेबांचं तरुण वयापासूनच एक निश्चित ध्येय्य ठरलेलं होतं. त्यासाठी त्यांनी आखलेली रुपरेषा अगदी परफेक्ट होती. त्यात अनेक अडथळे आले. अनेक प्रलोभनं आली. पण ते बधले नाहीत. डगमगले नाहीत. त्यांनी आपला प्रवास चालूच ठेवला. अनेकांनी त्यांना फक्त शिक्षणात लक्ष घालत असल्यामुळे देशप्रेमाचे उपदेश देखील केले. पण त्यांची स्ट्रॅटेजी परफेक्ट होती. आधी शिक्षण, आकलन, संघटन आणि मगच संघर्ष...“प्रॉव्हिन्शल डिसेंट्रलायझेशनऑफ इम्पिरियल फायनान्स ईन ब्रिटिश इंडिया” हा विषय घेऊन १९२१ च्या जुन महिन्यात बाबासाहेब एम. एस्सी. झाले. आता एम. एस्सी. ची पदवी मिळाल्यवर डॉक्टरेट साठी अभ्यास सुरु केला. डॉक्टर ऑफ सायन्स साठी “रुपयाचा प्रश्न” (The Problem of The Rupee) हा प्रबंध लिहुन १९२२ च्या पहिल्या तिमाहित लंडन विद्यापिठाला सादर केला. याच दरम्यान ते बॅरिस्टर झाले. या प्रबंधाच्या लिखानामुळे या आधि त्याना बॅरिस्टरच्या परिक्षेला बसता आले नाही.खरं तर १९२२ च्या मार्च-एप्रिल नंतर बाबासाहेबांचं लंडन मधिल शिक्षण पुर्ण झालं होतं. त्याना एम. एस्सी. व बॅरिस्टर या दोन्ही पदव्या मिळाल्या होत्या. डॉक्टरेट साठी प्रबंध सादर केला होता. आता त्यांच्याकडे मोकळा वेळ होता. पण या दरम्यान बॉन विद्यापिठातुन एखादी पदवी घ्यावी म्हणुन बाबासाहेब १९२२ च्या मे महिन्यात बॉनला पोहोचले. पण तिथे असतानाच त्यांना लंडनहून बोलावणं आलं. प्रा. एडविन कॅनन यांनी बाबासाहेबान ताबडतोब लंडनला परत येण्याचे कळविले. कारण बाबासाहेबांनी सादर केलेला प्रबंध ब्रिटीश राजवटीची लक्तरं त्यांच्या देशातील वेशीवर टांगणारा होता.त्यामुळेच प्राध्यापकानी या प्रबंधाचा तिखटपणा जरा कमी करायची सुचना दिली. बाबासाहेबांनी साफ शब्दात इन्कार केला. पण अखेरिस त्यांचा नाईलाज झाला. आणि त्यांनी ही सुचना मान्य केली पण आता तिकडे बॉन विद्यापिठाचा अभ्यास नुकताच चालु केल्यामुळे लगेच हा बदल करुन सुधारित प्रबंध सादर करणे जमणार नव्हते. या आधी लंडन विश्वविद्यालयाच्या विद्यार्थी संघापुढे “जबाबदार सरकारचे दायित्व” या विषयावर बाबासाहेबानी एक निबंध वाचला होता. तेंव्हा वातावरण फार तापले होते.१४ एप्रिल १९२३ रोजी बॅरिस्टर बाबासाहेब भारतात परतले तरी डॉक्टरेट मिळणं बाकीच होतं. चार महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर प्रबंधात योग्य सुधारणा करून तो पुन्हा सादर करण्यात आला. यावेळेसबाबासाहेबांंनी भाषेच्या अशा काही करामती केल्या की मूळ गाभा न बदलता आणि टिकेची धार जराही कमी न करता प्रा. एडविन यांना तो प्रबंध स्विकारावाच लागला. अन १९२३ च्या शेवटी लंडन विद्यापिठाने तो प्रबंध स्विकारुन बाबासाहेबाना “डॉक्टर ऑफ सायन्स” हि पदवी बहाल केली. लंडन मधिल पी. एस. किंग ऍंन्ड सन्सने १९२३ च्या डिसेंबर महिन्यात “द प्रोब्लेम ऑफ रुपी” हा प्रबंध ग्रंथ रुपाने प्रकाशित केला.इथपर्य़ंत बाबासाहेबांच्याशिक्षणाचा एक भला मोठा टप्पा पार पडला. आणि मग त्यांचा समाजकारणात प्रवेश झाला. थोडक्यात काय बाबासाहेबांनी स्वतः दिलेला संदेश.. शिका, संघटित व्हा अन् संघर्ष करा.. हा त्यांनी स्वतः अंमलात आणला. 1927 पर्यंत त्यांनी संघटनावर भर दिला. त्यात तीन वर्षे इनवेस्ट केलीत. त्यानंतरच ते राजकारणात उतरले.आणि आपण .. तीन मिनिटाचा बाईट मिळाला की.. गल्लीतले राष्ट्रीय नेते होतो...असो..

Sunday 24 April 2022

'अनाहिलेशन ऑफ कास्ट'

'अनाहिलेशन ऑफ कास्ट'आधुनिक भारतातील जातनिर्मूलन आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचापाया ज्या पुस्तकाने रचला ते पुस्तक म्हणजे दि अॅनहिलेशन ऑफ कास्ट...आजपासून सुमारे ८० वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अॅनहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक प्रकाशित झाले. खरं तर या पुस्तकाने प्रकाशनापूर्वीचभारतातील सामाजिक आणि धार्मिक राजकारणात प्रचंडखळबळ माजवली होती. परंतू त्याच्या प्रकाशनाच्या आज ८० वर्षांनंतरही या पुस्तकानं केलेलं क्रांतिकारक कार्य आपल्या अनुभवाला येत आहे.हे पुस्तक खरे तर एक भाषण आहे. १९३५ साली लाहोर येथील जातपात तोडक मंडळाच्या वार्षिक आधिवेशनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी करावयाचे अध्यक्षीय भाषण आयोजकांना आधिवेशनाआधीच पाठवून दिले होते. ते भाषण इतके टोकदार होते की आयोजकांना ते पचनी पाडताच आले नाही. त्यांनी घाबरून तो कार्यक्रमच रद्द करून टाकला. आणि ते भाषण झालेच नाही. त्यावेळी देशभरात प्रचंड मोठा वाद या निमित्ताने घडूनआला. गांधीजीसोबत अनेक दिग्गज नेत्यांनी या झाल्या प्रकारावर टिप्पणी केली होती. मग बाबासाहेबांनी सदर भाषण जसेच्या तसे १५ मे १९३६ रोजी पुस्तक रुपात प्रसिद्ध केले. भाषणाचे नाव होते... दी अॅनहिलेशन ऑफ कास्ट...मराठीत जातिसंस्थेचे निर्मूलन या नावाने प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकात बाबासाहेबांनी जातिव्यवस्थेची अतिशय क्रांतिकारी अशी समीक्षा केली होती.. त्यात प्रथमतःच जात ही मनाची अवस्था किंवा वृत्ती आहे ... इतकी सरळ आणि स्पष्ट मांडणी करण्यात आली होती. त्यातबाबासाहेब म्हणतात की...."जात ही मनाची अवस्था किंवा वृत्ती आहे. जातिविनाश म्हणजे भौतिक बंधनांचा विनाश नव्हे. जातिविच्छेद म्हणजे मनोवृत्तीतील परिवर्तन... हिंदू जातिभेद पाळतात कारण ते बुद्धिहीन वा अमानुष आहेत म्हणून नव्हे, तर ते धर्मपरायण असल्यामुळे! याला त्यांच्या मनात जातीय वृत्ती रूजविणारा धर्म जबाबदार आहे. खरा शत्रू जातिभेदपाळणारे लोक नसून त्यांना तो धर्म पाळावयास शिकविणारी शास्त्रे आहेत. त्यामुळे शास्त्रप्रामाण्यावरील श्रद्धा नष्ट करणे हाच खरा उपाय आहे. लोकांच्या श्रद्धा व मते यांची जडणघडण शास्त्रे करीत असताना आणि त्यांचा लोकांच्या मनावरील पगडा कायम असताना तुम्हाला यशाची अपेक्षा कशी करता येईल? धर्मशास्त्रप्रामाण्यास स्वत: आव्हान द्यायचे नाही, लोकांना शास्त्रांच्या आज्ञांवर विश्वास ठेवू द्यायचा आणि पुन्हा त्यांच्या वागणुकीवर व कृतींवर अमानुष, अविवेकी अशा विशेषणांनी टीका करायची, हा समाजसुधारणेचा मार्ग विपरीतच म्हटला पाहिजे. श्रीमान गांधींसकट कुणीही ही गोष्ट लक्षात घेतलेली दिसत नाही की, लोकांच्या कृती म्हणजे शास्त्रांचा त्यांच्या मनावर झालेल्या संस्कारांचा परिपाक होय. त्यामुळे त्यांची वागणूक ज्या शास्त्रांवर आधारित आहे त्या शास्त्रांवरील विश्वास उडाल्यावाचून ते आपले वर्तन बदलणार नाहीत. म्हणून समाजसुधारकांचे सर्व प्रयत्न फसले यात नवल नाही... धर्मशास्त्रांच्या जोखडातून प्रत्येक स्त्री-पुरुषास मुक्त करा.म्हणजे मग पहा, ते स्वत:च सहभोजन व आंतरजातीय विवाह करतात की नाही!.... शास्त्रप्रामाण्य धुडकावण्याची भगवान बुद्धाने जी भूमिका स्वीकारली ती तुम्ही स्वीकारा!"गांधीजींनी या पुस्तकाचे समीक्षण करताना हरिजन मध्ये दोन दीर्घ लेख लिहीले. आणि त्या लेखांतून डॉ. आंबेडकरांवर कसून टिका केली. डॉ. आंबेडकरांनी देखील या टिकेचे खंडन करणारे लेख लिहीले. या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीत बाबासाहेबांनी गांधीजींनी केलेली टिका आणि त्यांचे खंडन या दोहांचाही समावेश केला. सोबतच हे पुस्तक मराठी सोबत इतर अनेक भाषांत प्रसिद्ध केले गेले.पण या ग्रंथाचा सर्वात जास्त प्रभाव हा गांधीजीवर पहायला मिळाला. सुरूवातीच्या आयुष्यात चातुर्वण्य, जातिव्यवस्थेचे,सनातनी धर्माचे कट्टर पुरस्कर्ते असलेले गांधीजी मात्र नंतर आंतरजातीय विवाहाचे उघड उघड पुरस्कर्ते झाले. याचा दुरगामी परिणाम देशाच्या समाजकारणावर घडून आला. काँग्रेसच्या नीतींमध्ये बदल घडून आला. लोकांचा अस्पृश्यांसोबतचइतर जातींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलूलागला. जातीपातींच्या भिंतींना सुरूंग लावण्याचं काम केलं ते... अॅनहिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथानं…