Monday 25 April 2022

बाबासाहेब - एक परफेक्ट स्ट्रॅटेजीस्ट…

बाबासाहेबांचं तरुण वयापासूनच एक निश्चित ध्येय्य ठरलेलं होतं. त्यासाठी त्यांनी आखलेली रुपरेषा अगदी परफेक्ट होती. त्यात अनेक अडथळे आले. अनेक प्रलोभनं आली. पण ते बधले नाहीत. डगमगले नाहीत. त्यांनी आपला प्रवास चालूच ठेवला. अनेकांनी त्यांना फक्त शिक्षणात लक्ष घालत असल्यामुळे देशप्रेमाचे उपदेश देखील केले. पण त्यांची स्ट्रॅटेजी परफेक्ट होती. आधी शिक्षण, आकलन, संघटन आणि मगच संघर्ष...“प्रॉव्हिन्शल डिसेंट्रलायझेशनऑफ इम्पिरियल फायनान्स ईन ब्रिटिश इंडिया” हा विषय घेऊन १९२१ च्या जुन महिन्यात बाबासाहेब एम. एस्सी. झाले. आता एम. एस्सी. ची पदवी मिळाल्यवर डॉक्टरेट साठी अभ्यास सुरु केला. डॉक्टर ऑफ सायन्स साठी “रुपयाचा प्रश्न” (The Problem of The Rupee) हा प्रबंध लिहुन १९२२ च्या पहिल्या तिमाहित लंडन विद्यापिठाला सादर केला. याच दरम्यान ते बॅरिस्टर झाले. या प्रबंधाच्या लिखानामुळे या आधि त्याना बॅरिस्टरच्या परिक्षेला बसता आले नाही.खरं तर १९२२ च्या मार्च-एप्रिल नंतर बाबासाहेबांचं लंडन मधिल शिक्षण पुर्ण झालं होतं. त्याना एम. एस्सी. व बॅरिस्टर या दोन्ही पदव्या मिळाल्या होत्या. डॉक्टरेट साठी प्रबंध सादर केला होता. आता त्यांच्याकडे मोकळा वेळ होता. पण या दरम्यान बॉन विद्यापिठातुन एखादी पदवी घ्यावी म्हणुन बाबासाहेब १९२२ च्या मे महिन्यात बॉनला पोहोचले. पण तिथे असतानाच त्यांना लंडनहून बोलावणं आलं. प्रा. एडविन कॅनन यांनी बाबासाहेबान ताबडतोब लंडनला परत येण्याचे कळविले. कारण बाबासाहेबांनी सादर केलेला प्रबंध ब्रिटीश राजवटीची लक्तरं त्यांच्या देशातील वेशीवर टांगणारा होता.त्यामुळेच प्राध्यापकानी या प्रबंधाचा तिखटपणा जरा कमी करायची सुचना दिली. बाबासाहेबांनी साफ शब्दात इन्कार केला. पण अखेरिस त्यांचा नाईलाज झाला. आणि त्यांनी ही सुचना मान्य केली पण आता तिकडे बॉन विद्यापिठाचा अभ्यास नुकताच चालु केल्यामुळे लगेच हा बदल करुन सुधारित प्रबंध सादर करणे जमणार नव्हते. या आधी लंडन विश्वविद्यालयाच्या विद्यार्थी संघापुढे “जबाबदार सरकारचे दायित्व” या विषयावर बाबासाहेबानी एक निबंध वाचला होता. तेंव्हा वातावरण फार तापले होते.१४ एप्रिल १९२३ रोजी बॅरिस्टर बाबासाहेब भारतात परतले तरी डॉक्टरेट मिळणं बाकीच होतं. चार महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर प्रबंधात योग्य सुधारणा करून तो पुन्हा सादर करण्यात आला. यावेळेसबाबासाहेबांंनी भाषेच्या अशा काही करामती केल्या की मूळ गाभा न बदलता आणि टिकेची धार जराही कमी न करता प्रा. एडविन यांना तो प्रबंध स्विकारावाच लागला. अन १९२३ च्या शेवटी लंडन विद्यापिठाने तो प्रबंध स्विकारुन बाबासाहेबाना “डॉक्टर ऑफ सायन्स” हि पदवी बहाल केली. लंडन मधिल पी. एस. किंग ऍंन्ड सन्सने १९२३ च्या डिसेंबर महिन्यात “द प्रोब्लेम ऑफ रुपी” हा प्रबंध ग्रंथ रुपाने प्रकाशित केला.इथपर्य़ंत बाबासाहेबांच्याशिक्षणाचा एक भला मोठा टप्पा पार पडला. आणि मग त्यांचा समाजकारणात प्रवेश झाला. थोडक्यात काय बाबासाहेबांनी स्वतः दिलेला संदेश.. शिका, संघटित व्हा अन् संघर्ष करा.. हा त्यांनी स्वतः अंमलात आणला. 1927 पर्यंत त्यांनी संघटनावर भर दिला. त्यात तीन वर्षे इनवेस्ट केलीत. त्यानंतरच ते राजकारणात उतरले.आणि आपण .. तीन मिनिटाचा बाईट मिळाला की.. गल्लीतले राष्ट्रीय नेते होतो...असो..

No comments:

Post a Comment