Monday, 19 March 2018

सामर्थ्य भारताचे

डाँ. अब्दुल कलामांनी एक स्वप्न बघितलं होतं...भारताला महासत्ता बनविण्याचं. हे स्वप्न त्यांनी ज्यांच्या भरवशावर, विश्वासावर, आधारावर बघितलं होतं तो आधारस्तंभ युवक व्यसनांच्या व वासनेच्या आहारी जावून एखाद्या भुग्यांने पोखरलेल्या व किड लागलेल्या झाडाप्रमाणे झाला आहे. युवकरूपी दगड एकावर एक रचून यशोशिखर सर करायच आहे. पण तो दगडच पाश्चिमात्य संस्कृतीच्या अंगिकारामुळे ठिसूळ झाला आहे. मग भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न कोण पुर्ण करणार...! जगात एक यशस्वी राष्ट्र म्हणून वावरताना यशाच्या आकाशातील प्रगतीची गरूडझेप कशी होणार, म्हणून युवकांनो नविन वर्षात जीवन सुवर्णमय करण्याच्या योजंआ आखत असतांना देशाच्या उज्वल भविष्याची पण योजना आखा. मुलीसोबत चाळे करायला मिळते म्हणून संस्कृती जपण्याचा नावाखाली टपोरीबाजी करण्यासाठी हातात टिपऱ्या न पकडता त्याच हातांनी समाजविघातक कृत्य हाणून पाडा. आपल्या घरी अन्नाची नासाडी होवू न देता, पोटात अन्नाचा एक-एक घेण्यासाठी आतुरलेल्या भुकेलेल्यांन अन्न दया. समाजकार्यासाठी आपल्या जीवनातील पानटपरिवरचा वेळ द्या. फँशनच्या नावाखाली कपड्यावर पाण्याप्रमाणे पैसे उधळणाऱ्यांनी अगांवर कपडे नसणाऱ्या व आकाशच पांघरून असलेल्यांना अंग झाकण्याच्या वस्त्रासाठी मदत करा. भ्रष्टाचाराचा राक्षस आतंकवाद व दहशतवादापेक्षाही देशाला पोखरत आहे. त्याला हद्दपार करा. फक्त शरिरशोषणासाठी मुलींवर प्रेम न करता व तिच्यासाठी स्वताची नस कापायला तयार असणाऱ्या तरूणांनो एकेक थेंबाने लहानाचा मोठा करणाऱ्या पालकांवर आई वडिलावर प्रेम करा. गुटखा, तबांखु खावून जिच्या पवित्र अंगावर खेळलो, बागडलो लहानाचे मोठे झालेत त्या मातेसमान मातीवर मातीवर थुंकण्यापेक्षा समाजविघातकावर थुंका. बिडी सिगारेट च्या धुरांचे रूपांतर अशा सुगंधी, धुरात करा की, त्या धुराचे रूपांतर सुजलाम सुफलाम नावाचा गंध या राष्ट्रातुन दरवडेल. ज्या दिवशी आपण सर्व तरून असे वर्तन करू, तोच दिवस असेल...ज्या दिवशी भारत प्रगतीची गरूडझेप घेत असेल.....एक प्रगत राष्ट्र म्हणून जात वावरत असेल......जगात महासत्ता म्हणून ओळखला जाईल.

✍महेश हातझाडे, धाबेटेकडी

(पुर्वप्रकाशित दैनिक देशोन्नती)

No comments:

Post a Comment