Monday 4 January 2021

पद्मश्री हलधर नाग

"साहेब दिल्लीला यायला पैसे नाहीत, कृपया मिळालेला पुरस्कार पोस्टाने पाठविता का?"

हा प्रश्न यांच्या नावासमोर कधी 'श्री' लागला नाही. तीन कपडे, एक तुटलेली रबराची चप्पल, एक चष्मा व जवळ रक्कम 732 रुपये असलेल्या व पद्मश्री पुरस्कार प्राप्त हलधर नाग यांचा जेव्हा त्यांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाला तेव्हाचा.

ओडीसा चे हलधर नाग जे कोसली भाषेचे प्रसिद्ध कवी आहेत. विशेष बाब अशी की, त्यांनी लिहिलेल्या सर्व कविता आणि 20 महाकाव्य त्यांना तोंडपाठ आहेत.

संबलपुर विद्यापीठांमध्ये यांचे साहित्य आता पाठ्यक्रमचा भाग झाली आहेत. साधे राहणीमान, साधे कपडे, पांढरा धोतर, गमचा आणि बनियान वापरत असलेले हलधर नाक अनवाणी पायानेच राहतात हलदार नाग एका दलित व गरिब परिवारातून पुढे आले आहेत. दहा वर्षे आयुष्य असताना आई-वडिलांच्या मृत्यूनंतर तिसऱ्या वर्गात शिक्षण सोडले होते. निराधार व अनाथ म्हणून जगत असताना ढाब्यावर भांडे घासले. नंतर एका शाळेत स्वयंपाकी म्हणून काम करित असतांना काही वर्षानंतर एक हजार रुपये कर्ज घेऊन पेन पेन्सिल चे दुकान त्याच शाळेसमोर सुरू करून आपला उदरनिर्वाह चालवत होते.

हलधर नाग यांनी 1995 च्या जवळपास स्थानिक उडिया भाषेत राम सबरी सारख्या काही धार्मिक ग्रंथावर लिहून लोकांना ऐकवने सुरू केले. भावनांनी ओतप्रोत भरलेल्या कविता लिहून ते एवढे लोकप्रिय झाले की, साहित्य सेवेसाठी राष्ट्रपतीच्या असते पद्मश्री पुरस्कार दिला गेला. आश्चर्य हे की हलदर नाग हे फक्त तिसरी पर्यंत शिकलेले आहेत. एवढेच नाही तर त्यांच्या साहित्यावर पाच विद्यार्थी पीएचडी पण करत आहेत.

No comments:

Post a Comment