Saturday 11 July 2020

महाकाव्यातील व्यक्ती परिचय- अश्वत्थामा

वडीलांच्‍या कपटाने केलेल्या वधाचा बदला घेण्यासाठी केलेली एक चूक महागात पडून डोक्यावर भडभडती जखम घेऊन मृत्युला चिरंजीवित्वच्या वरदानामुळे कवटाळू शकत नाही. आणि सुखाने जगू शकत नाही असे महा  महापराक्रमी सर्व अस्त्र शस्त्र संपन्न पात्र म्हणजे अस्वत्थामा.

अस्वत्थामा चा जन्म भारद्वाज ऋषी चा पुत्र द्रोण व ऋषी शरद्वान ची मुलगी कृपी ही यांच्या पोटी अंगिरा गोत्रात झाला. आईसुद्धा धर्मज्ञानी, सुशील व तपस्वी होती. जन्म घेते वेळी अस्वस्थामा ने अश्वाप्रमाणे आवाज केला व सर्व दिशांनी तो आवाज गुंजत होता म्हणून त्याचे नाव अस्वत्थामा ठेवले गेले.

आई-वडील संपन्न घरचे होते पण अश्वत्थाम्याच्या जन्मानंतर त्यांची आर्थिक स्थिती खालावत गेली. हीच परिस्थिती दूर करण्यासाठी अस्वस्थामा चे वडील द्रोणाचार्य हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी परशुरामजीच्या आश्रमात गेले. ज्ञान प्राप्त करून परतल्यानंतर गुरु द्रोण यांच्या येथे त्यांची गाय सुद्धा शिल्लक राहिली नव्हती. ऋषी पुत्रांना दुध पिताना बघून अस्वस्थामा सुद्धा दुधासाठी रडत होता तेव्हा तांदळाच्या पिठात पाणी टाकून द्रोण पुत्र अस्वस्थामा ला पाजत होते. तरीसुद्धा अस्वस्थामा "मी दुध पिले" असे बोलून आनंदित होत होता. यावरून हेच सिद्ध होते की अस्वस्थामा ने लहानपणी हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतीत करून आनंदी जगत होता.

पोटच्या मुलाला दूध पाजण्यासाठी व आपल्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी द्रोणाचार्य राजा द्रुपदाकडे गाईची मागणी करू लागले पण भर दरबारात अस्त्र शस्त्र पारंगत वडिलांचा अपमान सत्तेपुढे होते हे तिथे उपस्थित असलेल्या अस्वस्थामा ने बघितले व कायमचे मनावर करून घेतले. राजा दृपदा कडून झालेला अपमान उराशी घेऊन द्रोणाचार्य व पुत्र अस्वस्थामा हस्तिनापुरात आले व राजकुमारांना शस्त्र पारंगत करण्यासाठी शिक्षण देऊन संपूर्ण भारत वर्षामध्ये सर्वश्रेष्ठ गुरु म्हणून द्रोणाचार्य नावारूपास आले. गुरुदक्षिणा म्हणून पांडवांनी जिंकलेले द्रुपद राजाचे राज्य गुरु द्रोणाचार्य यांना दिल्यानंतर गुरु द्रोणाचार्यांनी अर्धे राज्य द्रुपदांना परत करून अर्ध्या राज्याचे राजा म्हणून अस्वस्थामा कारभार पाहू लागला. ज्या दरबारात वडिलांचा अपमान झाला होता त्याच राजाचे राज्य आता अस्वस्थामा च्या ताब्यात होते.

संपूर्ण भारतवर्षातील महान गुरू असलेल्या द्रोणाचार्य पुत्र अस्वस्थामा धनुर्वेद, सगळे दिव्यास्त्र ज्ञानी होता कृपाचार्य, अर्जुन व कर्णापेक्षा श्रेष्ठ योद्धा असलेला अस्वस्थामा वडील द्रोणाचार्य, पितामह भीष्म व परशुरामाचा सारखा धनुर्धर बनला होता. अस्वत्थामाचे विरत्व, धैर्य, शस्त्रनिपुणता, नीती ज्ञान व बुद्धिमत्तेविषयी महाभारत कालीन सगळे प्रमुख व्यक्ती त्याच्या बळ व बुद्धीचे प्रशंसक होते.

जेव्हा महाभारत युद्धात भीम पुत्र घटोत्कचच्या नेतृत्वात राक्षस सेनेने कौरवांवर आक्रमण करून कौरवांना नेस्तनाबूत करण्याच्या मार्गावर आणून ठेवले, तेव्हा फक्त अस्वात्थामामुळे कौरवांचा पराभव होता होता वाचला. त्याने घटोत्कच पुत्र अंजनपर्वाला मारून घटोत्कचाला सुद्धा जखमी केले होते. कौरव सेनेचे अकरावे सेनापती असलेल्या अस्वस्थामा ने द्रुपद, सुत सुरथ, शत्रुंजय, कुंतीभोजचे 90 पुत्र, बलानिक,शतानिक, जयारव, श्रुताह्य, हेममाली, पृषध्र व चंद्रसेना सारख्या विर योध्यांना वीरगती प्राप्त केली.

अस्वस्थामा करीत असलेल्या पांडव सेनेच्या विध्वंस यामुळे पांडव पक्षात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कारण अस्वत्थामा च्या पराक्रमापुढे पांडवांचे पराभव निश्चित वाटत होते. वडिलांच्या व मुलाच्या पराक्रमापुढे जवळ येऊन ठेवलेला पराभव टाळण्यासाठी अस्वत्थामा नावाच्या हत्तीला मारून युधिष्ठिराला खोटे बोलण्यास भाग पाडून दृष्टधुमद्वारे गुरु द्रोणाचार्यांचा वध करण्यात आला, हे सर्वज्ञात आहे.

वडिलांच्या कपटाने झालेल्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सुडाने पेटून उठलेला अस्वस्थामा पुढे नारायणास्त्राचा प्रयोग पांडव सेनेवर करून कृष्णाच्या निष्ठेने व युद्धनीती ने त्याचा प्रभाव कमी झाल्यामुळे अस्वसत्थामा त्यामुळे निराशेच्या गर्तेत जात होता. पुढे अग्नी अस्त्राचा प्रभावाने अर्जुन सुद्धा वारंवार वाचत होता.  स्वतःच्या शस्त्रांचा प्रभाव पांडवांवर होत नाही हे बघून तो आपल्या पराक्रमावर व वीरतेवर  संशय घेऊ लागला. हातातील धनुष्य फेकून दिले.

युद्धाच्या अठराव्या दिवशी कौरव पक्षातील फक्त तिघेजण उरले होते......अस्वत्थामा, कृपाचार्य व कृतवर्मा. ह्याच दिवशी अस्वस्थामा ने सुडाने पेटून पांडवांचा वध करण्याची प्रतिज्ञा केली, पण त्याला समजत नव्हते कि केलेली प्रतिज्ञा कशी पूर्ण करायची. त्याच रात्री एका घुबडाने कावळ्याच्या घरट्यावर आक्रमण करून त्याने कावळ्यांना मरतांना पाहिले व त्याच प्रकारे पांडवा चा वध करण्याचे ठरवले पण यात गफलत होऊन पांडवांच्या पुत्रांना पांडव समजून त्यांची हत्या अंधार्‍या रात्री झोपेत करण्यात आली. या झटापटीत दृष्टधुम्नही अस्वस्थामाकडून  मारला गेला.

आपल्या मुलांच्या मृत्यूने द्रौपदीचे अनावर झालेले दुःख बघून गांडीवदारी अर्जुन अस्वत्थामा च्या मागावर लागतो. अर्जुना पुढे अस्वत्थामाला कुठेही सुरक्षितता वाटत नव्हती. ह्याच विवंचनेतून तो अर्जुनावर ब्रह्मास्त्राचा उपयोग करतो. त्याला प्रत्युत्तर म्हणून अर्जुनालाही ब्रह्मास्त्र चालवावा लागतो. ऋषीमुनींच्या प्रार्थने वरुन अर्जुन आपला ब्रह्मास्त्र परत घेतो,पण ब्रह्मास्त्र परत घेता येत नसल्याने अस्वस्थामा उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्राचा उपयोग करतो.

झोपेतल्या बालकांना मारणे स्त्रीवर व तिच्या गर्भावर ब्रह्मास्त्राचा उपयोग करून एक पराक्रमी, वीर, धैर्यशील शस्त्र पारंगत द्रोण पुत्र अश्वत्थामा युद्धाच्या शेवटी अज्ञानी व अधर्मी कृती केल्यामुळे त्याला त्याच्या जीवनाच्या दुसऱ्या द्यायला सुरुवात करावी लागते.

जन्मताच शिवजीचे अंश असलेला दिव्य मनी कपाळावर असलेला अस्वस्थामाचा तो मणी काढून, त्याला दारोदार त्या मणी काढलेल्या जखमेवर तेल लावण्यासाठी भटकावे लागते व चिरंजीव त्वच्या वरदानामुळे नरक यातना भोगाव्या लागतात.

No comments:

Post a Comment